राष्ट्रगीताच्या खटल्याविषयी न्यायालयाने सोमवारी आपला निर्णय दिला. या निर्णयाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.उच्च न्यायालय निर्णय देत म्हणाले देशभक्ती दाखवण्याकरता सिनेमा हॉल मध्ये उभे राहण्याची सक्ती करण्यात येऊ नये. न्यायालयाने केंद्र सरकारला सिनेमाघरात वाजणाऱ्या राष्ट्रगीतांच्या नियमांवर फेरविचार करा असं ही सांगितले.
पुढे असे ही म्हणाले की जर कोणी राष्ट्रगीतावर उभे राहत नसेल तर त्याचा अर्थ तो देशभक्त नाही असा अर्थ काढला जाऊ नये. केंद्र सरकारला याविषयी कोणते कायदे नियमात हवेत असे वाटत असेल तर त्यांनी ते बदल करावे त्याकरता न्यायालयाना वेठीस धरू नये. सिनेमाघरात वाजणाऱ्या राष्ट्रीय गीत व उभे राहणे त्यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी झाली.